Close Menu
BHS NEWS
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    contactbhsnews@gmail.com
    BHS NEWSBHS NEWS
    Join Now
    Thursday, October 8
    • मुख्यपृष्ठ
    • अंबेजोगाई
    • विश्लेषण
      1. राजकारण
      2. खेळ
      3. तंत्रज्ञान
      4. View All

      Inside NASA’s Plans for the First Human Mission to Mars

      January 8, 2025

      How EVs Are Shaping the Future of Urban Commutes

      January 8, 2025

      Daring Looks Celebrities Wore to Paris Fashion Week this Year

      March 14, 2021

      Paris Fashion Week: The Contemporary Shopping in Accra

      March 11, 2021
    • BHS SHORTS
    • विचारमंच
      • विशेष लेख
      • संपादकीय
    BHS NEWS
    Home»ताज्या बातम्या»अंबेजोगाई»नगराध्यक्ष मुंदडांनी पाळला शब्द; कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून ‘संक्रांत’ केली गोड!
    अंबेजोगाई

    नगराध्यक्ष मुंदडांनी पाळला शब्द; कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून ‘संक्रांत’ केली गोड!

    नगराध्यक्ष मुंदडांनी पाळला शब्द; कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून ‘संक्रांत’ केली गोड!
    BHS@123By BHS@123March 15, 2021Updated:October 8, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Telegram Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अंबाजोगाई: शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या मात्र मागील चार महिन्यांपासून वेतनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना नूतन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकीनंतर पदभार स्वीकारताना दिलेले आश्वासन पूर्ण करत मुंदडा यांनी संक्रांतीच्या सणापूर्वी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनापैकी एका महिन्याचा पगार त्यांच्या खात्यात जमा केला आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या शेकडो कामगारांची संक्रांत यामुळे गोड झाली असून, शहरात नगराध्यक्षांच्या या संवेदनशील निर्णयाचे स्वागत होत आहे.

    नगर परिषदेच्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. सणासुदीच्या काळात हक्काचे पैसे मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता होती. ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी पदभार स्वीकारताच या प्रश्नाला प्राधान्य दिले. त्यांनी प्रशासनाला थकीत कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे कडक निर्देश दिले होते. या मोहिमेला यश आले असून, जमा झालेल्या निधीचा पहिला विनियोग कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यामुळे कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा झाली आहे.

    नगर परिषदेची आर्थिक स्थिती सध्या नाजूक असली तरी, मार्च अखेरपर्यंत संपूर्ण आर्थिक घडी पुन्हा बसवण्याचा निर्धार मुंदडा यांनी व्यक्त केला आहे. येणाऱ्या काळात जशी कर वसुली होईल, त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांचे उर्वरित थकीत वेतनही प्राधान्याने दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. केवळ स्वच्छता कर्मचारीच नव्हे, तर थकीत वीज बिले आणि इतर प्रलंबित देयके मार्गी लावण्यासाठी प्रशासन नियोजनबद्ध प्रयत्न करत आहे. शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि कष्टकरी कर्मचाऱ्यांचे हक्क वेळेवर मिळण्यासाठी शहरातील नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता व पाणी कर भरून पालिकेला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहनही नगराध्यक्षांनी यावेळी केले आहे.

     
    बालाजी शेरेकर

    मुख्य संपादक बीएचएस न्यूज़

    ट्रेंडिंग बातम्या
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email

    Related Posts

    आ. नमिता मुंदडा यांच्या मागणीला यश; सोयाबीन, मूग आणि उडीद नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    January 22, 2021

    मध्यरात्री बीड बायपासवर देवदूत बनून धावले पोलीस; बंद पडलेली कार १ किमी ढकलून

    January 19, 2021

    विहिरीच्या मंजुरीसाठी ७० हजारांची लाच घेताना तरनळीचा सरपंच एसीबीच्या जाळ्यात

    January 18, 2021

    Average Mobile Data Usage Now Exceeds 10GB Per Month

    January 17, 2021
    72

    Review: Effects of Online Relationships Culture

    January 14, 2021

    Is a ‘Soft Launch’ Right for Your Relationship?

    January 14, 2021
    ताज्या बातम्या

    नगराध्यक्ष मुंदडांनी पाळला शब्द; कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून ‘संक्रांत’ केली गोड!

    March 15, 2021

    आ. नमिता मुंदडा यांच्या मागणीला यश; सोयाबीन, मूग आणि उडीद नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    January 22, 2021

    मध्यरात्री बीड बायपासवर देवदूत बनून धावले पोलीस; बंद पडलेली कार १ किमी ढकलून

    January 19, 2021
    Stay In Touch
    • Facebook
    • Instagram
    • YouTube
    Demo
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • होम
    • ताज्या बातम्या
    • अंबेजोगाई
    • विश्लेषण
    • BHS SHORTS
    • विचारमंच
    • संपर्क
    © 2026 BHS NEWS. Designed by Nikhil.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.