Close Menu
BHS NEWS
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    contactbhsnews@gmail.com
    BHS NEWSBHS NEWS
    Join Now
    Thursday, October 8
    • मुख्यपृष्ठ
    • अंबेजोगाई
    • विश्लेषण
      1. राजकारण
      2. खेळ
      3. तंत्रज्ञान
      4. View All

      Inside NASA’s Plans for the First Human Mission to Mars

      January 8, 2025

      How EVs Are Shaping the Future of Urban Commutes

      January 8, 2025

      Daring Looks Celebrities Wore to Paris Fashion Week this Year

      March 14, 2021

      Paris Fashion Week: The Contemporary Shopping in Accra

      March 11, 2021
    • BHS SHORTS
    • विचारमंच
      • विशेष लेख
      • संपादकीय
    BHS NEWS
    Home»ताज्या बातम्या»अंबेजोगाई»विहिरीच्या मंजुरीसाठी ७० हजारांची लाच घेताना तरनळीचा सरपंच एसीबीच्या जाळ्यात
    अंबेजोगाई

    विहिरीच्या मंजुरीसाठी ७० हजारांची लाच घेताना तरनळीचा सरपंच एसीबीच्या जाळ्यात

    Having not yet visited Sector 10, follow these steps for a free upgrade.
    BHS@123By BHS@123January 18, 2021Updated:January 15, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Telegram Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    केज: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींच्या फाईलवर गटविकास अधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठांच्या सह्या घेऊन कार्यारंभ आदेश मिळवून देण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना तरनळीच्या सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी सायंकाळी केज पंचायत समितीच्या पाठीमागील एका खोलीत ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    महादेव प्रताप खेडकर (वय ३५, रा. तरनळी, ता. केज, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या सरपंचाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांच्या शेतजमिनीत नरेगा योजनेतून जलसिंचन विहीर मंजूर झाली होती. या विहिरींच्या प्रस्तावावर गटविकास अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन मंजुरी मिळवून देण्यासाठी आरोपी खेडकर याने प्रत्येकी २५ हजार रुपयांप्रमाणे १ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

    या संदर्भात २३ डिसेंबर २०२५ रोजी तक्रार प्राप्त झाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २३ आणि २४ डिसेंबर रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, सरपंच खेडकर यांनी तक्रारदाराकडून १० हजार आणि उर्वरित तिघांकडून प्रत्येकी २० हजार असे एकूण ७० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. १ जानेवारी २०२६ रोजी पहिली सापळा कारवाई करण्यात आली होती, मात्र त्यावेळी आरोपीने रक्कम स्वीकारली नाही. अखेर १३ जानेवारी रोजी केज पंचायत समितीच्या पाठीमागे असलेल्या स्वतःच्या खोलीत ७० हजार रुपये घेताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email

    Related Posts

    नगराध्यक्ष मुंदडांनी पाळला शब्द; कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून ‘संक्रांत’ केली गोड!

    March 15, 2021

    आ. नमिता मुंदडा यांच्या मागणीला यश; सोयाबीन, मूग आणि उडीद नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    January 22, 2021

    मध्यरात्री बीड बायपासवर देवदूत बनून धावले पोलीस; बंद पडलेली कार १ किमी ढकलून

    January 19, 2021

    Average Mobile Data Usage Now Exceeds 10GB Per Month

    January 17, 2021
    ताज्या बातम्या

    नगराध्यक्ष मुंदडांनी पाळला शब्द; कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करून ‘संक्रांत’ केली गोड!

    March 15, 2021

    आ. नमिता मुंदडा यांच्या मागणीला यश; सोयाबीन, मूग आणि उडीद नोंदणीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    January 22, 2021

    मध्यरात्री बीड बायपासवर देवदूत बनून धावले पोलीस; बंद पडलेली कार १ किमी ढकलून

    January 19, 2021
    Stay In Touch
    • Facebook
    • Instagram
    • YouTube
    Demo
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • होम
    • ताज्या बातम्या
    • अंबेजोगाई
    • विश्लेषण
    • BHS SHORTS
    • विचारमंच
    • संपर्क
    © 2026 BHS NEWS. Designed by Nikhil.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.